
यवतमाळ, प्रतिनिधी
महानुभाव भक्त परिषद, यवतमाळ यांच्या अंतर्गत राष्ट्रीय नंदगवळी समाज संघटना व नंद गवळी समाज फाउंडेशन (संस्था नोंदणी अधिनियम १८६९ च्या अधिनियम २१ नोंदणी क्रमांक यवतमाळ ००००७०५/२०२५ दि.१७ डिसेंबर २०२५ ) यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय मोटार सायकल बाराखांडी तीर्थ दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा १६ जानेवारी २०२६ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.या यात्रेची सुरुवात १६ जानेवारी रोजी सकाळी सीनामाय मंदिर, टिळक वाडी, यवतमाळ येथून होणार असून पहिल्या दिवशी जामवाडी, जांभोरा, दिग्रस, लाख मार्गे पुसद येथे विश्राम करण्यात येणार आहे.१७ जानेवारी रोजी शिळोणा, हर्षी, मुळावा, पार्डी, दगडधानोरा मार्गे मुळावा येथे पंचकृष्ण कॉलेज (अजयभाऊ झरकर) यांच्याकडे पिडाहरण होईल. त्यानंतर गगनमाळ, अंबाळी मार्गे आबासाहेब बाबासाहेब – बाराखांडी येथे दर्शन होणार आहे. पुढे प.पू. त. फुलाअक्का संन्यासी श्रीकृष्ण मंदिर, उमरखेड येथे देवपूजा व प्रसाद वंदन करण्यात येईल. याच दिवशी चुरमुरा (खांड) येथे प.पू. प.म. दत्तराजबाबा संन्यासी यांच्याकडे विश्राम राहील.१८ जानेवारी रोजी विडुळ, कृष्णापुर, ढानकी, मन्याळी, किनवट मार्गे दहेली (खांड) येथे प.पू. प.ई. श्री कृष्णानंद दादाजी अमृते यांच्याकडे उदक विधी तसेच प.पू. प.म. श्री शहागडकर बाबा निवघा यांच्याकडे पिडाहरण होईल. त्यानंतर उमरी (कापेश्वर), सदोबा सावळी मार्गे आर्णी येथील श्री दत्तमंदिर व जवळा (खांड) येथे सायंकाळी ६ वाजता प्रायश्चित विधी, सुभचिंतन व महाप्रसादाने यात्रेचा समारोप होणार आहे.या यात्रेस प.पू. प.म. आचार्यप्रवर श्री लाडबाबा हरसूल, प.पू. प.म. श्री रेवेराजबाबा शास्त्री (यवतमाळ), प.पू. प.म. आचार्यप्रवर श्री संन्यासीबाबा (उमरखेड), प.पू. प.म. आचार्य त. प्रेमाला अक्काजी पंजाबी (जामवाडी), प.पू. त. फुलाअक्का संन्यासी (उमरखेड), पु. म. श्री अंतराजदादाजी अंकुळनेकर, आबासाहेब बाबासाहेब यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या मोटार सायकल यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प.पू. प.म. धनंजयदादा पंजाबी, प.पू. प.म. गोविंदराज बाबा रिद्धपूरकर, प.पू. प.म. शहापूरकर बाबा (येरला), प.पू. ई. श्रीकांतमुनी दादा पंजाबी (नागपूर) व प.पू. ई. माधव मुनी दादा अमृते यांचे मार्गदर्शन लाभत असून, संपूर्ण नियोजन प.पू. प.म. गोविंदराज बाबा रिद्धपूरकर यांनी केले आहे.ही मोटारसायकल तीर्थयात्रा केवळ धार्मिक प्रवास नसून भक्ती, संस्कृती व सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी असल्याने सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
