
जोडमोहा येथील वॉर्ड क्र. 1 मध्ये श्री बालवीर हनुमान मंदिरात यंदाही हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. गावातील तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवात घेतला सहभाग सकाळी श्री हनुमानजींच्या पवित्र मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती करून मंदिराची आकर्षक फुग्यानी सजावट करण्यात आल्याने परिसर अधिकच प्रसन्न झाला होता. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादासाठी संपूर्ण नागरिकांनी मोठी गर्दी गावातील केली होती. या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विनोद वाघाडे, पवन धोत्रे, मारुती जाधव, महादेव राऊत,पवन जाधव, चेतन नक्षीने, विवेक कांबळे, विक्रम नेवारे,प्रीतम जाधव, पंकज चव्हाण,गौरव घुगरे, अमित गेडाम, राहुल येसनसुरे, शुभम मेश्राम, अकबर आत्राम, चेतन मेश्राम, करण घेर, भगतसिंग नेवारे, रोशन मेश्राम, स्मित मानकर, कार्तिक देवकर, ऋषिकेश दिगोरे, राजेश चव्हाण, वंशिल खेकडे, प्रेमानंद मडावी, मंगेश मेश्राम, रोहित बंडाटे, अभिजीत कुंभारे, ओम टेकाम, निखिल सूर्यवंशी, आकाश मेश्राम, नाना आडे, अक्षय गेडाम, योगेश मानकर, बॉबी राठोड, प्रदीप टेकाम, सानिध्य मानकर, मयूर वाघाडे, देवांशू जाधव, पवन चव्हाण, शिवम मुरकुटे,निकेश नेवारे, आदींसह अनेक तरुण व ज्येष्ठ मंडळींनी परिश्रम घेतले. उत्सवामुळे जोडमोहा गावात सर्वत्र कौतुक होत आहे
