
प्रतिनिधी हिवरी
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथून लसीकरणाची सुरुवात करण्यात आली एच पी व्ही लसीकरणास सुरुवात करण्यात आल्याने परिसरातील याचा अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळेल या योजनेचे उद्घाटन जिल्हा अधिकारी विकास मीना यांचे हस्ते करण्यात आले ,तर प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करण्यात आली यात पिण्याच्या पाण्याचे फिल्टर,बंद असल्याचे दिसून आले व सीसीटीव्ही बंद असल्याने ते दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले या वेळी प्रमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुभाष ढोले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ क्रांती कुमार नावंदीकर वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण नैताम,डॉ श्रद्धा पुजारी सरपंच रंजना भगत यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी जिल्हा अधिकारी यांनी एच पी व्ही लस उद्याच्या मातेस जीवन दायी ठरू शकते, हि लस खाजगी मध्ये घ्यायची असल्यास ती सर्व सामान्यांना न परवडणारी असून शासनाने तुमच्या भविष्याचा विचार करून खूप मोठी सुविधा उपलब्ध करून दिली. हि मोहीम सर्वत्र राबविण्यात येत असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिकारी विकास मीना यांनी केले.या वेळी आरोग्य कर्मचारी, अनेक नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.
