
स्थानिक प्रतिनिधी
कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र ,महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात खरात प्रकरण गाजत आहे. खरात भोंदू बाबा महिलांवर भावनिक आणि संवेदनशील वागून त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करत होता आणि त्यांचे व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करत होता अनेक महिलाना त्यांनी आपल्या जाळ्यात ओढले, माजी महिला आयोगाचे अध्यक्ष चाकणकर बाई यांनी कधीही महिलांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली नाही ,पण भोंदू बाबाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या टोटल इन्व्हॉल आहे. त्यामुळे आतापर्यंत जितक्या शंभर महिलेवर त्यांनी अन्याय अत्याचार केला त्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी चाकणकरांनी पुढे येणे गरजेचे आहे .पण ते असं करू शकत नाही कारण त्या स्वतःच या प्रकरणाच्या सूत्रधार आहे .चाकणकर यांना सह आरोपी करणे गरजेचे आहे .यासाठी सुद्धा अटक करावी जोपर्यंत चाकणकरांना अटक होणार नाही तोपर्यंत या सर्व गोष्टीचा उलनगडा होणार नाही. कारण चाकणकर ह्या खरात इतक्याच कारणीभूत आहे .असं सर्व महिलांना वाटते म्हणून चाकणकर यांना ताबडतोब सह आरोपी म्हणून अटक करावी चाकणकरांना ताबडतोब अटक न झाल्यास मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये उद्रेक निर्माण होईल व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आंदोलन छेडणार म्हणून चाकणकरांना अटक व्हावी आणि चाकणकरांकडून नवीन नवीन माहिती मिळू शकते कारण आज आपण पाहत आहोत महाराष्ट्रामधील मंत्रिमंडळांमधील जवळपास 39 ते 40 आमदार भेटले असे श्री केसरकर साहेबांनी सांगितलेलं आहे .पण प्रत्येक आमदारां सोबत प्रतेक वेळेस चाकणकर चे फोटो आहे. मग चाकणकरणी सर्वांना भेट तर करुन दिली नाही ,ना हा प्रश्न चिन्ह निर्माण होते . या सर्वांची उत्तरे आणि भोंदू बाबा खरात यांच्यासोबत असलेले त्यांचे संबंध हे लोकांना माहीत होणे गरजेचे आहे . त्यामुळे त्यांना अटक केल्यास नवीन नवीन माहिती पुढे येईल या सर्व प्रश्नाला वाचा फोडायचे असेल तर चाकणकरला सह आरोपी म्हणून अटक करणं गरजेचं आहे चाकणकरांना ताबडतोब अटक करावी अशी आम्ही मागणी करत आहे .मीनाक्षी सावळकर पानझाडे राहुल गांधी विचार मंच ऑल इंडिया महिला काँग्रेस अध्यक्षा ,मागणी करत आहे.
