
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ आयोजन शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ रोजी कळंब तालुक्यातील जोडमोहा येथे अत्यंत उत्साहात करण्यात आले. जगदंबा माता मंदिर परिसरात संपन्न झालेल्या या शिबिरात प्रशासकीय सेवा थेट सामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यात आल्या. याप्रसंगी ‘उमेद’ अभियानांतर्गत महिला बचत गटांना तब्बल ०२ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले, जो महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठा टप्पा मानला जात आहे.
महिला सक्षमीकरणाला ‘उमेद’चा बळकट आधार
उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पंचायत समिती कळंब अंतर्गत असलेल्या ‘उन्नती महिला प्रभाग संघ, जोडमोहा’ मधील ०६ ग्रामसंघांना व्यवसायासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी ५० लाख रुपयांचा ‘समुदाय गुंतवणूक निधी’ (CIF, OSF, SVEP) वितरित करण्यात आला. यासोबतच बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून १८ समूहांना १ कोटी ५० लाख रुपयांच्या बँक कर्जाच्या धनादेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जोडमोहाच्या सरपंच सौ. सुनंदा वासुदेव मुरकुटे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा निरीक्षक अधिकारी मा. श्री. सगपाल मेश्राम, नायब तहसीलदार (महसूल) मा. श्री. अनिलजी राजगुरे, श्रीमती माला गेडाम (निवडणूक), मा. श्री. अक्षयजी देशपांडे (कळंब), पुरवठा निरीक्षक श्रीमती संध्या मनवर, गटविकास अधिकारी श्री. भूपेंद्र बाहेकर, बँक मॅनेजर मा. श्री. योगेश नाचणे, मंडळ अधिकारी मा. श्री. प्रशांत घडीनकर, उपसरपंच श्री. मारोती शंकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य श्री. विनोद रामभाऊ मैस्कर, सौ. कल्पनाताई हरीश बांधटे आणि श्री. पवनभाऊ जाधव उपस्थित होते.
प्रशासकीय यंत्रणेचा सहभाग
शिबिरात महसूल विभागाच्या तलाठी दिपाली लिलाधर हर्षे (हिवरी), श्रीमती दिपाली गुबरे (देवनळा), कु. स्नेहल स्वप्नील फुलमाळी (वटबोरी), कु. दुर्गा गंगाधर शेडमाके (नांझा), श्री. कैलास बनाईत (पोटेगव्हाण) यांनी सेवा दिली. ग्रामविकास विभागातून ग्रामसेवक श्री. इंगळे साहेब (जोडमोहा) व श्री. सुजित स्थूल (बेलोरी) तर कृषी विभागातून कृषी सहाय्यक मनोज पवार, कु. नेवारे मॅडम, श्री. अजय चव्हाण आणि श्री. हेमराज देवगडे यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले.
उमेद टीम व ग्रामसखींचे परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अभियान व्यवस्थापक मिलिंद चोपडे, उमेश शिंदे, प्रतिभा बावनकर, प्रशांत दुरबुडे, प्रभाग समन्वयक जनार्दन कावरे, जयश्री बांडबुचे, समुदाय पशुधन व्यवस्थापक दीपक लीलारे आणि प्रभागसंघ व्यवस्थापक सौ. ममता लखपती यांनी मार्गदर्शन केले.
तसेच उन्नती प्रभागसंघाच्या अध्यक्षा सौ. सुरेखा धनराज बोपटे, सचिव सौ. चंदाताई मोहधरे, कोषाध्यक्ष सौ. सविता पाटील, सौ. मनकर्णा मलांडे यांच्यासह जोडमोहा प्रभागातील सर्व ग्रामसखी: सीमा आत्राम, भावना तोडसाम, सुजाता मसराम, अर्चना मसराम, रजनी पाटील, रंजना भुजाडे, संगीता फरकाडे, सुनीता मोहुरले, सूर्यकांत शेंडे, किरण सूर्यवंशी, प्रतिभा शेंडे, जयश्री आत्राम, ममता पाटील, वंदना भगत, नलिनी टेकाम, गीता पेदोर, कैलास लीलारे, दीपक नितेश डहारे, कल्याणी कटारे आणि सीमा लीलारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या शिबिरामुळे अनेक प्रलंबित कामांचा निपटारा झाल्याने नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
