
प्रतिनिधी
रोजी आयोजित गायत्री हास्य व योगाच्या तर्फे जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त कवियत्री अर्चना वासेकर कवितेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश गायणार हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अंजली जवळकर कार्यक्रमाच्या प्रमुख अर्चना वासेकर . हे होते या वेळी गणेश गायणार यांचे स्वागत रमण अग्रवाल यांनी केले तर अंजली जवळकर यांचे स्वागत श्रीखंडे यांनी केले कार्यक्रमाच्या प्रमुख अर्चना वासेकर यांचा शाल श्रीफळ देऊन सर्व महिला सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. स्वागताच्या कार्यक्रमानंतर कवियत्री अर्चना वासेकर यांनी विविध विषयावर कविता त्यांनी सादर केल्या . वरील कार्यक्रमाला उपस्थित डॉ सूर्यप्रकाश जयस्वाल ,डॉ. प्रदीप भोजने ,नरेंद्र गणेडिवाल संस्थेचे अध्यक्ष शिवकुमार मोर कार्यक्रमाचे संचालन विजय देऊळकर यांनी केले आभार डॉ.पुनसे सरांनी आभार मानले. वरील सर्व कार्यक्रमाला गायत्री योगा ट्रस्ट सर्व सभासद उपस्थित होते.
