
उमरखेड कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर व तालुक्यात सर्वत्र सुरु असलेले अवैध धंदे बंद करावे यासाठी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार का केली तसेच वारंवार अवैध धंद्यांच्या विरोधात बातम्या का प्रसारित करतो याचा राग मनाशी धरून उमरखेड ठाणेदारांनी धाडस 007 या यु ट्यूब चॅनलचे संपादक अमित देशमुख यांचे विरुद्ध उमरखेड पोलीसांनी आकसापोटी दाखल केलेले विविध गंभीर गुन्हे मागे घेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन उमरखेड तालुका दैनिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठविले आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की , दि . 12 मार्च रोजी रात्री 9:30 वाजताचे दरम्यान धाडस 007 या युट्यूब चॅनलचे संपादक अमित देशमुख यांना पत्रकार या नात्याने उमरखेड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा फोन आल्यामुळे तक्रार अमित तेथे पोहचल्यावर नेहमी अवैध दारू , जुगार , गांजा आदि उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत चालणाऱ्या गैर प्रकारांबाबत तक्रारी तसेच युट्यूब चॅनल व्दारे समाज माध्यमांवर बातम्या प्रसारित करणाऱ्या अमित देशमुख विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची नामी संधी साधून ठाणेदार शंकर पांचाळ व त्यांच्या काही सहकारी पोलीस अधिकाऱ्यांनी कुभांड रचून त्याचे विरुद्ध जातीय तेढ निर्माण करण्यासाठी युवकांना चिथावणी देणे , शासकिय कामात अडथळा निर्माण करणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच मध्यरात्री दाखल केले . ही कार्यवाही सुडबुद्धीने करण्यात आलेली असून त्याचे विरुद्ध उमरखेड पोलीसांनी घोर अन्याय केल्यामुळे अन्यायकारी गुन्हे तत्काळ मागे घेऊन यापुढे वृत्तपत्रात अवैध धंद्यांविरुद्ध बातम्या प्रसारित करणाऱ्या प्रतिनीधींविरुद्ध अशाच प्रकारचे खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदर प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून अमित देशमुख यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे , अशा आशयाचे निवेदन उमरखेड तालुक्यातील दैनिक वृत्तपत्र प्रतिनीधींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे . यावेळी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष साहेबराव धात्रक , महात्मा फुले पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष मुडे , विभागिय प्रादेशिक दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षा श्रीमती सविता चंद्रे यांच्यासह लक्ष्मीकांत नंदनवार , अरविंद ओझलवार , निळकंठ धोबे , व्यंकटेश पेन्शनवार, गजानन भारती , शैलेश ताजवे , डॉ. विशाल माने ,अरुण बेले , भिमराव नगारे ,अविनाश मुन्नरवार , अझरउल्ला खान , ज्ञानेश्वर ठाकरे, संभाजी भोयर ,वसंत देशमुख ,ताहेर मिर्झा , संतोष कलाने, संजय देशमुख , विजय आडे , दत्तात्रय देशमुख , राजु गायकवाड , स्वप्नील मग रे , सुनिल ठाकरे आदिंच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
