
जोडमोहा येथे भव्य आरोग्य शिबीर संपन्न१२२ रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचारयुवा जागर ट्रस्ट, संत खटेश्वर महाराज सेवा समिती आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचा संयुक्त उपक्रम यवतमाळ/जोडमोहा ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच अद्ययावत आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या आरोग्याच्या तक्रारींचे निवारण व्हावे, या उदात्त हेतूने युवा जागर ट्रस्ट आणि श्री संत खटेश्वर महाराज सेवा समिती, जोडमोहा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद नोंदवला.या आरोग्य शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (VNGMC), यवतमाळ येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपलब्ध करून देण्यात आले होते. या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने शिबिरात आलेल्या रुग्णांची सखोल आरोग्य तपासणी केली.शिबिरात एकूण १२२ गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर निदान झालेल्या आजारांवर रुग्णांना जागेवरच मोफत गोळ्या व औषधांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागात अशा प्रकारचे शिबीर आयोजित केल्यामुळे अनेक वृद्ध आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.शिबिराच्या यशस्वितेसाठी युवा जागर ट्रस्ट किशोर बाभुळकर,करण गेडाम,आणि श्री संत खटेश्वर महाराज सेवा समितीचेकार्यकर्ते आनंद जैस्वाल, पंकज भोयर,पवन धोत्रे, प्रवीण ढाकूलकर, बंडू वाघाडे, प्रशांत भोयर,सचिन चंदनकर पवन जाधव, नीलेश जुनघरे,अक्षय टेकाम. ऋषभ दिघोरे , राधे मसराम, अभी कुंभारे,रोहित बंधाते,जयपाल वाघाडे इत्यादी नी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
