
प्रतिनिधी
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिराचा वर्धापनदिनाचा भव्य दिव्य कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य आचार्य प.पू. प म श्री कारंजेकर बाबा (मोठेबाबा) अमरावती, कवीश्वर कुलाचार्य आचार्य प.पू.प म श्री.लाड बाबा हरसुल, प पु धनंजय बाबा पंजाबी जामवाडी, प पु म .गोविंदराज बाबा रिद्धपूरकर,तसेच अनेक मान्यवर महंतांची उपस्थिती लाभली होती. त्यांच्या पवित्र सान्निध्यामुळे कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक उंची प्राप्त झालीया निमित्ताने आयोजित करण्यात आलेला पालखी सोहळा अत्यंत भव्य व आकर्षक होता. रथातील देखावा पाहून जणू साक्षात ईश्वरच विराजमान आहेत, अशी भावना सर्व भक्तांच्या मनात जागृत झाली. हा पालखी सोहळा वटबोरी, बेलापूर हेटी, सोनखास मार्गे निघून टपाल हेटी येथे मोठ्या उत्साहात समारोप करण्यात आला.यानंतर आयोजित करण्यात आलेल्या धर्मसभेत महानुभव पंथ, देवपूजा, आचार-विचार आणि धर्मजागृती यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी परमपूज्य महंत श्री शुक योगेंद्र शेवलीकर बाबा वागदा, परमपूज्य श्री सारंगधर बाबा नागपूर, परमपूज्य श्री जाण्योव्यास व्यास बाबा उमरगांव, परमपूज् बाबा बिडकर पिंपरी वर्धा परमपूज्य कृष्णराज बाबा येळमकर मौदा श्रीकांत मुनी दादा शिवनी परमपूज्य अनंतराज बाबा रेलकर घाटंजी, परमपूज्य महंत श्री राजू दादा नांदेडकर मोहदा, परमपूज्य महंत श्री परमपूज्य प्रदीप राज दादा पंजाबी बेलोरा, पंकज राज दादा पंजाबी बेलोना, प.म श्री अंकुश दादा लाड पांढरकवडा, प्रेमराज दादा जामोदेकर इत्यादी संत महंत या कार्यक्रमास उपस्थित होते. प पु प म कुलाचार्य आचार्य प्रवर श्री कारंजेकर बाबाजी यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी ओंकार चेके अध्यक्ष स्वर्गीय शिरसाठ प्रणित ग्रामीण पत्रकार संघ तथा राष्ट्रीय नंद गवळ समाज संघटना अध्यक्ष, रमेश भाऊ झांबरे पो पा.लक्ष्मण देवतळे.पोलीस निरीक्षक वडगाव विकास धांडे ,सुभाष भाऊ काकडे चंद्रपालजी कालोकार राजूभाऊ साठे केशवराव चेके,दादाराव घोडे, अरुणभाऊ अरबट,सुधाकरजी चौधरी,इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत या भव्य कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय नंदगवळी समाज फाउंडेशन व संघटना,करण्यात आले आहे दुपारी तीन ते पाच पर्यंत वडबोरी ते टपल हे टिम भव्य शोभायात्रा पाच ते सहा पंचकृष्ट पूजन व पंचवतार उपहार संत पूजन व भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात या कार्यक्रमाचे आयोजन त.सिंधुताई सेवलीकर,आणि राष्ट्रीय नंदगवळी समाज संघटना तथा फाउंडेशन यांचे वतीने करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन अंकुशभाऊ काकडे, गजानन चेके राजुभाऊ साठे समस्त समाज बांधवानी केले. सर्व भाविक भक्तांनी महाप्रसाद घेतल्यानंतर श्री. चक्रधर भक्ती संध्या कार्यक्रमात गायक विशाल जोगदेव यांनी आपल्या मधुर व भावपूर्ण आवाजात चक्रधर स्वामींची गीते, गवळणी व भक्तीगीते सादर करून संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. त्यांच्या गायनाने उपस्थित सर्व भक्त मंत्रमुग्ध झाले. संगीताच्या गजरात सादर झालेल्या नृत्यांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवलीअशा या भव्य, दिव्य आणि भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन तपस्विनी सिंधुताई शेवलीकर, राष्ट्रीय नंद गवळी समाज संघटना तसेच टपाल हेटी येथील सर्व समाज बांधव यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले होते. त्यांच्या परिश्रमांमुळे हा सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडलाअशा या भव्य कार्यक्रमामुळे महानुभव पंथाची परंपरा, संस्कृती आणि समाजातील एकात्मता अधिक दृढ झाल्याचे जाणवले. टपाल हेटी, सोनखास, बेलापूर हेटी व वटबोरी येथील समाजबांधव तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सहभागी भक्तांनि सहभाग नोंदवला या कार्यक्रमास पांढरकवडा,घाटंजी, यवतमाळ,कळंब,राळेगाव आर्णी दारव्हा नेर तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते
