
यवतमाळ आंतरराष्ट्रीय मानव अधिकार असोसिएशन, नवी दिल्लीच्या विदर्भातील संघटन विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आर्णी तालुका अध्यक्षपदी रफिक सरकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हाध्यक्ष विवेक वानखडे व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली असून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.नियुक्तीनंतर रफिक सरकार यांना तालुका अध्यक्ष म्हणून संघटनात्मक कामकाज तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय मानव अधिकार असोसिएशनच्या माध्यमातून अधिकाधिक सदस्य नोंदणी करून संघटनेचा विस्तार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यावेळी मान्यवरांनी सांगितले की, पुढील काळात मानवाधिकारांचे संवर्धन, समाजातील वंचित व गरजू घटकांना कायदेशीर मदत, योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्या हक्कांसाठी प्रभावी लढा देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात येईल. या कार्यात तालुका स्तरावर रफिक सरकार सक्रिय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. विदर्भातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मानवाधिकार जनजागृती आणि सामाजिक न्यायासाठी संघटनेचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात वाढेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.दरम्यान, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार असोसिएशनमध्ये कार्य करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची नोंदणी सुरू असून इच्छुकांनी जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधून सदस्यत्व घ्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
