
प्रतिनिधी
तहसील कार्यालय यवतमाळ येथे वाढत्या उन्हामध्ये नागरिकांना अणि गरजू लोकांना दिलासा मिळावा म्हणून नगरसेवक चंदूभाऊ चौधरी यांच्या हस्ते छत्री वितरण करण्यात आले. तसेच हनुमान जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले. तहसील कार्यालय येथे दररोज अनेक नागरिक, विद्यार्थी महिला कामानिमित्त बाहेरगावाहून व शहरातून येत असतात. या बाबतींत दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते अजय किन्हीकर यांनी हा उपक्रम घडवून आणला.या सर्व छत्र्या गोदावरी मल्टिस्टेट चे सीईओ धनंजय तांबेकर, व मॅनेजर रवीभाऊ इंगळे यांनी नगरसेवक चांदूभाऊ चौधरी जवळ दिल्या, त्या बद्दल त्यांचे आभार देखील मानण्यात आले.,उपअधिक्षक भूमिलेख कार्यालयातील प्रथम अपिलीय अधिकारी . अलोणे , जन माहिती अधिकारी राऊत ,जगदीशभाऊ टोम्पे ,,मुन्नाभाऊ खंदेडिया,बाबू उर्फ नितीन त्रिवेदी,पिल्लारे , पाथरकर ,अरुणभाऊ ठाकूर, सारडे , आशिष सर्मोकदम,चव्हाण ,राठोड , कांबळे,वंजारीतसेच अनेक नागरिक व कर्मचारी आणि तहसील कार्यालयातील अर्जन्युज देखील उपस्थित होते.
