
प्रभात फेरी काढण्यात आली!उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय परिसर स्वच्छता!पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता!उपजिल्हा रुग्णालय परिसरा मध्ये स्वच्छता व !रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप! तालुका प्रतिनिधी *दारव्हा* होमगार्ड पथका कडुन 79 वा महाराष्ट्र होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह साजरा मा.अशोक थोरात साहेब जिल्हा समादेशक होमगार्ड अधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक.यांच्या आदेशाने तसेच. राजेंद्र बनसोड केंद्र नायक. यांच्या मार्गदर्शनाखाली दारव्हा पथका कडुन 79 वा महाराष्ट्र होमगार्ड वर्धापन दिन (सप्ताह) आज २८/१२/२०२५ रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांचे अध्यक्ष दिनेश गावंडे ए पि आय . तसेच प्रमुख पाहुणे राजेश चव्हाण. व ए आर खान तालुका समादेशक अधिकारी. अब्दुल नईम पलटण नायक.अनिल आडे पलटण नायक.उपस्थीत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला आली सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली.लगेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात परीसरात स्वच्छता केली. तसेच पोलीस स्टेशनच्या आवारात व उपजिल्हा रुग्णालय दवाखान्याचा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली. व यावेळी उपजिल्हा रुग्णालया मधील रुग्णांना फळे व बिस्किटाचा वाटप करण्यात आला. प्रथमता कार्यक्रम होमगार्ड संघटनेचे जनक तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी भाई देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश गावंडे API यांनी होमगार्ड विषयी माहिती दिली व त्यांच्या अनुभवातून होमगार्ड सैनिक खरोखर देश सेवे सोबतच कोणताही बंदोबस्त असो दुर्गादेवी गणपती बंदोबस्त असतो व कायदा सुव्यवस्थेचा बंदोबस्त असो होमगार्ड सैनिक ईमानीत बारे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्त करतो असे गावंडे आपल्या भाषणात बोलत होते. यावेळी तालुका समादेशक अधिकारी ए आर खान यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंता लोंढे पलटण नायक.यांनी केले आभार अब्दुल नईम पलटण नायक यांनी मानले. 79 वा महाराष्ट्र होमगार्ड वर्धापन दिनामध्ये पुरुष व महिला होमगार्ड उपस्थित होते.व दारव्हा. दिग्रस. नेर .लाडखेड आर्णी.होमगार्ड यांनी चांगल्या प्रकारे योगदान करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला या वेळी नंदु शेंडे.भागवान शेंद्रे.रामनाथ राऊत आनंद मडावी.अझर शेख.शिला बोदडे. रेखा घोडे.वंदना भालेराव. कांता राऊत.सुनंदा. महानंदा.विजया रोडे.आदी पथकातील पुरुष व महिला होमगार्ड सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.( दिनेश गावंडे यांनी होमगार्ड विषयी माहिती दिली व त्यांच्या अनुभवातून होमगार्ड सैनिक खरोखर देशसेवे सोबतच कोणताही बंदोबस्त असो दुर्गादेवी असो किंवा गणपती बंदोबस्त असतो व कायदा सुव्यवस्थेचा बंदोबस्त असो होमगार्ड सैनिक ईमानीत बारे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्त करतो असे दिनेश गावंडे API आपल्या भाषणात बोलत होते.
