
प्रतिनिधी
यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत जांब ग्रामपंचायतीचा कारभारा कळसच गाठला जांब येथील देवबाजी रामाजी उइके यांचे दोन एकर शेत सर्वे नंबर १०० गट नंबर १९८ मधील ०.८१ आर हि जमीन चीफ एक्झिकेटिव्ह ऑफिसर या नावाने दान देण्यात आली की उद्याचे भविष्य याच जागेवर घडेल म्हणून देवबाजी उईके यांची इच्छा होती की या दान दिलेल्या जागेवर शाळा होईल म्हणून हे शेत दान देण्यात आले नाही जनपत अधिकारी याच नावाने हे शेत आहे ते पद बरखास्त झाले या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणी चौकशी करून जी जमीन ज्या उद्देशाने दान देण्यात आली तोच उद्देश पूर्ण व्हावा ,त्या ठिकाणी स्मशान भूमीचे काम केल्या जात आहे ते करण्यात येऊ नये असे आदेशही देण्यात आले असताना येथील सरपंच त्या आदेशाला केराची टोपली दाखवत ते काम सुरूच ठेवण्यात आले आहे विशेष म्हणजे एक स्मशान भूमी असताना दुसऱ्या स्मशान भूमीचे काय काम असा सवालही नागरिकांन कडून करण्यात येत आहे.ग्रामपंच्यात ला आलेला फंडाचा योग्य उपयोग न करता केवळ पैशाची खैरात होत आहे.याची वरिष्ठांनी त्वरित दखल घेऊन हे स्मशान भूमीचे काम बंद करून या जमिनीचा उपयोग शाळेकरीता करावा अन्यथा दान देण्यात आलेली जमीन आम्हाला परत देण्यात यावी अशी मागणी रामचंद्र उइके व लक्षणं उईकें संबंधितांच्या नातवांनी केली आहे
