
यवतमाळ : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यवतमाळ येथे दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. वैचारिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबत विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते. मागील वर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर यावर्षीही शिवजयंती घराघरात पोहोचविण्याच्या उद्देशाने “भव्य घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून पालक, विद्यार्थी तसेच इच्छुक नागरिक कुणालाही यात सहभागी होता येईल. स्पर्धकांनी आपल्या घरी, शाळेत, महाविद्यालयात, शिकवणी वर्गात किंवा प्रतिष्ठानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती किंवा प्रतिमेची आकर्षक व कल्पक मांडणी करावी अथवा त्यांच्या जीवनावर आधारित देखावा साकारावा. सजावटीचे कुटुंबासह काढलेले छायाचित्र १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपूर्वी खालील व्हॉट्सअॅप क्रमांकावर पूर्ण नाव व पत्त्यासह पाठवावे:योगीराज अरसोड –९८२२७१६२०१, शशिकांत खडसे – ७७९८३९०८७०, महेंद्र वेरूळकर – ९८८११७३११६, विजय निकम – ९४२००५०४८० किंवा श्रीदीप इंगोले – ९४०४२६२०२५ यांना पाठवावेप्राथमिक निवड झालेल्या पहिल्या दहा उत्कृष्ट व अभिनव सजावटींच्या ठिकाणी परीक्षक मंडळी प्रत्यक्ष भेट देऊन अंतिम परीक्षण करतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.स्पर्धेतील विजेत्यांना पुढीलप्रमाणे रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येतील: प्रथम पारितोषिक : ₹२००० रोख, स्मृतिचिन्ह व गौरवपत्र, द्वितीय पारितोषिक : ₹१५०० रोख, स्मृतिचिन्ह व गौरवपत्र, तृतीय पारितोषिक : ₹१००० रोख, स्मृतिचिन्ह व गौरवपत्रतसेच सर्व सहभागी मावळ्यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. भव्य बक्षीस वितरण समारंभ २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ८.३० वाजता शिवतीर्थ (शिवाजी महाराज पुतळा परिसर, गार्डन रोड, नाट्यगृहाच्या शेजारी, यवतमाळ) येथे आयोजित करण्यात आला आहे.या स्पर्धेचे प्रकल्प अधिकारी योगीराज अरसोड, शशिकांत खडसे, असून महेंद्र वेरूळकर, श्रीदीप इंगोले, विजय निकम, विजय ठाकरे, अविनाश देशमुख, विनोद दोंदल, विष्णू बुटले, विजय इंगोले आणि देव डाबरे हे संयोजक म्हणून कार्य पाहत आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
