
यवतमाळ – उमरखेड येथील नायब तहसीलदार यांच्या सह इतर दोन व्यक्तीने मध धुंद अवस्थेत उमरखेड पुसद मार्गावर येत असलेल्या गौळ गावानजीक रोडवर रात्री नऊ वाजता च्या दरम्यान एका सामान्य व्यक्तीला बंदुकीचा धाक दाखवून नाहक मारहान केल्याचा प्रकार उजेडात आला असुन. याप्रकरणी सुरेश हराळ यांनी संबंधित उमरखेड तहसील येथील नायब तहसीलदार विश्र्वाभंर राणे यांच्या सह इतर दोन व्यक्तीवर फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्याची मागणीची तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे केली आहे. सविस्तर वृत्त असे की दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान गौळ येथील सुरेश दादाराव हराळ हे आपल्या पंधरा वर्षाच्या मुलासह मोटार सायकलने शिळोना येथून दहा दिवसाचा कार्यक्रम आटपुन गावाकडे येत असताना गौळ गावांनजीक रोडवर एम एच 29 सी जे 2282 या क्रमांकाची गाडी रोडवर एका ट्रॅक्टर जवळ आडवी उभी असल्याचे दिसून आल्यामुळे हा अपघात झाला असवा असा अंदाज समजून थांबले असता तेथील मधु धुंद अवस्थेत असलेल्या अनोळखी उमरखेड येथील नायब तहसीलदार विश्र्वाभंर राणे यांच्या सह इतर दोन व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून नाहक मारहान केल्याचा प्रकार घडला असल्याने याप्रकरणी सुरेश हारळ यांनी 112 या क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळतात पोफाळी पोलीस स्टेशन चे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचताच सर्वांना पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले असता संबंधित व्यक्ती हे नायब तहसीलदार असल्याने सुरेश हराळ यांनाच धाकधडप करून तुमच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करतो अशी तंबी देण्यात आल्याचे बोलले जात आहे घडलेल्या घटने आपल्यावर अन्याय झाला असल्या प्रकरणी सुरेश दादाराव हराळ राहणार गौळ तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांनी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल करून संबंधितावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे , घडलेल्या घटने संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्यामध्ये संबंधित व्यक्ती हे मध धुंद अवस्थेत दिसून येत असून नायब तहसीलदार यांच्या कमरेला बंदूक व हातात दांडा घेऊन बोलताना व डोलताना दिसून येत असल्यामुळे घडलेल्या घटनेने परिसरात एकच चर्चा होताना दिसून येत असून याप्रकरणी आता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे .
