
सोबतच बालकांची तज्ञ डॉक्टर्स कडून आरोग्य तपासणी आणि रक्त चाचण्या आणि औषधांचे वाटप….औचित्य वाढदिवसाचे… शिबिराला प्रचंड प्रतिसाद. जवळपास ४५० बालकांना मिळाला लाभ…मनसेचे यवतमाळ जिल्ह्याचे आक्रमक नेतृत्व तसेच नवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. अनिलभाऊ हमदापुरे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कुपोषित बालकांना प्रोटीन पावडर, पोषक आहार आणि जीवनावश्यक वस्तूंचे आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन स्थानिक टिळक स्मारक येथे २८ जाने. रोजी टिळक स्मारक येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाचे आयोजन अनिल हमदापुरे मित्र परिवार आणि नवक्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिराला प्रामुख्याने साईश्रद्धा हॉस्पिटलचे डॉ. विजय मुन, मनसेचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार, नवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल हमदापुरे, डॉक्टर अनिल आखरे, डॉ. तारक सर,डॉ. स्वप्नील पतींगे,यवतमाळ जिल्हा कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर सर, एमएसआरए संघटनेचे अनुप भुसावार तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या सर्व कुपोषित बालकांना पोषण आहाराच्या किटचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद लाभला.यवतमाळ जिल्ह्यातील कुपोषणाच्या प्रश्नावर काहीतरी सकारात्मक उपाययोजना व्हावी या दृष्टीकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न हा गंभीर स्वरूपाचा होत असून शासन कुठे तरी कमी पडत असल्याचा अनुभव या शिबिराच्या माध्यमातून आला. या शिबिराला सर्वप्रथम अंदाजे 300 बालक येतील असा अंदाज होता परंतु जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न किती गंभीर स्वरूप धारण करतोय याचा अंदाज शिबिराला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादातून आला. या शिबिरात जवळपास ४५०कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी झाली. सोबतच त्यांच्या रक्त चाचण्या पण मोफत करण्यात आल्या. या शिबिराला यवतमाळ येथील बालरोग तज्ञ डॉ.अनिल आखरे, डॉक्टर सचिन तारक, डॉस्वप्नील पतींगे,डॉ. प्रिया अनिल हमदापुरे यांनी बालकांची तपासणी केली. यावेळी सर्व बालकांना उत्तम दर्जाचे औषधी चे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमात आलेल्या बालकांना मोफत एका किट चे वाटप करण्यात आले त्यात प्रामुख्याने एक प्रोटीन पावडर, 2 बॉटल मल्टिव्हिटॅमिन , शेंगदाणा लाडु पाकीट, पेंड खजुर पाकीट, राजगिरा लाडु पाकीट, तसेच दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.या शिबिरात अतिदुर्गम भागातील बालकांचीही नोंदणी करण्यात आली जे प्रवाहापासून वंचित राहतात. येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठ्या प्रमाणात याप्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्याचा मानस या प्रसंगी अनिल हमदापुरे यांनी बोलून दाखवला.जिथे शासन कमी पडेल तिथे नवक्रांती आणि आम्ही पोहचू असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणचे या पूर्वीही विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आज पर्यंत जवळपास ५०० बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया, कॉकलीयर एम्प्लान्ट, बोन म्यारो,पायाची शस्त्रक्रिया,नेत्र शस्त्रक्रिया, कोरोना काळातील सामाजिक कार्य सह अनेक समाज उपयोगी उपक्रम अविरत पणे सुरू असल्याची माहिती या प्रसंगी देण्यात आली, मनसेच्या धोरणानुसार जनसेवा हीच ईश्वर सेवा असुन या कार्याची प्रेरणा माझे आई-बाबा, पत्नी,कुटुंब यांच्याकडून मिळत असल्याचे मत या प्रसंगी अनिल हमदापुरे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विशेष करून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे फार्मासिस्ट सोना तलरेजा, ममता कापसे ,चंद्रशेखर खडतरे, तसेच मातोश्री नर्सिंग महाविद्यालयाचे विशेष सहकार्य लाभले, यासह आरबीएसके चे कार्यक्रम अधिकारी कुणाल पिसोळे आणि जिल्हा आरोग्य विभागाचे औषधी निर्माते जाधव सर आणि मातोश्री नर्सिंग च्या परिचारिका ,अंगणवाडी सेविका सीमा क्षीरसागर , वर्षा राठोड , अर्चना हुमणे, कुमुदिनी नागपुरे, माधुरी भारती, प्रीती डफडे, वर्षा वानखेडे, संगीता ताकसांडे, संगीता भेंडे, प्रतिभा कायकुटे, रेशमा गौरकर,यांनी विशेष सहकार्य दिले. या शिबिरासाठी एमएसएमआरए संघटनेचे अमोल चौधरी,अनुप भुसावार, प्रणय बनुकर,ब्रिजेश त्रिपाठी यांचे विशेष सहकार्य लाभले.या शिबिराला प्रामुख्याने शिवसेनेचे विकास पवार, अनिल सोळंकी, जिल्हा परिषद पतपेढीचे अध्यक्ष महेश सोनेकर सर, यांनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी सौरभ अनसिंगकर, शिवम नांदुरकर, अंजली पारधे, तिलक गुगलीया,वसीम मवाल सौरभ अनसिंगकर, नरेश गंगावणे, हेमंत जोशी, सुधांशू काळे, संदीप गाडगे, सालिक भाई,पद्मनाभ जोशी,यांनी अथक परिश्रम घेतले. या शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात बालकांचे पालक, नवक्रांती संघटनेचे रेहान लाला, अनिल मेश्राम,बंटी राजूरकर,निरज पातलबन्सी, सोनु मस्के, सागर नांदेकर,अशोक खोडे,मुकेश खरवडे, अमोल बोबडे, नितीन चौधरी, सचिन चौधरी,गोपाल वाघधरे, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
