प्रतिनिधी चिखल वर्धा चिंतामण घोडाम
संभापूर येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळावा तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तत्काळ आणि निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.गावातील नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
