
प्रतिनिधी हिवरी
केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत सामाजिक न्यात व अधिकारीता निशुल्क शिबिर व मोफत सहाय्यक उपक्रम वितरण कार्यक्रमाचे आयोजनयवतमाळ तालुक्यामध्ये नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधव भगिनी तसेच 60 वर्षावरील जेष्ठ वयोश्री नागरिकांसाठी खासदार संजय देशमुख यांच्या सहाय्याने, सहाय्यभूत साधनांचे ADIP ( अपंग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे ) आणि RVY ( राष्ट्रीय वयोश्री योजना ) अंतर्गत आज यवतमाळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,हिवरी येथे मोफत साहित्य वाटप करण्यात आले,हे साहित्य मध्ये दिव्यांग बांधवांना दैनादिन उपयोगीक वस्तू देण्यात आले, जेष्ठ नागरिकांना मान,कंबर तथा गुडघे यांचा पट्टा तसेच शौच खुर्ची, काठी, व्हीलचेअर आदी वस्तूंचे वितरण यावेळी करण्यात आले, केंद्रीय स्तरावरून सर्व प्रकारच्या योजना यांचा लाभ मतदारसंघातील नागरिकांना मिळवून देण्यात आला तसेच नागरिकांना कुठलेही अडचण तथा समस्या असल्यास अर्ध्या रात्री सुद्धा सदैव जनतेसाठी तत्परतेने हजर असल्याचे खासदार संजय देशमुख यांनी सांगितले, हिवरी या गावाबद्दल आपुलकी असल्याने तुमच्या समस्या सोडवणेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू असेही खासदार संजय देशमुख म्हणाले, नागरिकांनी जुना भवन येथील वॉल कंपाऊंड ची मागणी खासदार देशमुख यांच्या कडे केली असता येथील वॉल कंपाऊंड खासदार निधीतून करून देण्याचे खासदार संजय देशमुख यांनी सांगितले,यावेळी प्रकल्प समन्वयक डॉ किरण पावरा, जिल्हाप्रमुख किशोर इंगळे,उपजिल्हाप्रमुख राजेंद्र धोटे, तालुकाप्रमुख गजानन पाटील,सरपंच रंजना भगत,विजयजी मुंधडा, सुनीता मडावी, अक्षय ठाकरे, गणेश आगरे, स्वयंम सहाय्यक गजानन नाचपेलवार, दिनकरजी भवरे, नितीन गावंडे, अमोल महेर, बबन चेके, तुकाराम शहारे, रामकृष्ण भोंडे, अनंता राऊत, संध्याताई अतकरी, सुभाष मडावी, दत्तात्रय गावंडे, सिद्धार्थ भगत, दाऊद खान, संदीप खोडकुंभे, राजू शहारे,आकाश बगडते, प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरी येथील वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रवीण नैताम, व कर्मचारी वृंद आशा स्वयंम सेविका,तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यमाचे संचालन अशोकराव खोडकुंभे यांनी केले.
