
प्रतिनिधी
उद्योजकता, नवकल्पना आणि व्यापाराच्या नव्या संधींचा संगम साधणारा भव्य जैन बिझनेस कार्निवल यवतमाळ शहरात 6 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. समता मैदान, यवतमाळ येथे होणाऱ्या या चार दिवसीय कार्निवलचे आयोजन जोश फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले असून, स्थानिक ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजक, व्यापारी, स्टार्टअप्स आणि नवोदित व्यावसायिकांसाठी हे एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.या बिझनेस कार्निवलमध्ये विविध उद्योग क्षेत्रांतील आकर्षक स्टॉल्स, उत्पादन व सेवांचे सादरीकरण, नेटवर्किंग सत्रे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच व्यवसायवाढीसाठी उपयुक्त माहिती व संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन, स्थानिक व्यवसायांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि उद्योजकांमध्ये परस्पर सहकार्य वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.व्यवसायासोबतच मनोरंजनालाही विशेष स्थान देण्यात आले असून, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, लहान मुलांसाठी खेळणी, विविध प्रकारचे रुचकर खाद्यपदार्थ आणि नव्या संकल्पनांसाठी उत्कृष्ट मंच या कार्निवलची खास वैशिष्ट्ये ठरणार आहेत. याशिवाय अनेक मान्यवर, कलाकार व विशेष पाहुणे उपस्थित राहून सहभागींचे मार्गदर्शन करणार आहेत.या अनोख्या उपक्रमात उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी तसेच व्यवसायात रस असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक जैन फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
