
प्रतिनिधी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत येणाऱ्या 18 शासकीय आश्रम शाळेकरिता शैक्षणिक सत्र 2025 – 26 मध्ये मा. प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांच्या अभिनव संकल्पनेतून प्रशासन ते सुशासन आणि एक दिवस पर्यटनाचा अशी आनंदाची पर्वणी ठरलेला हा मोलाचा उपक्रम आश्रम शाळेतील विद्यार्थ्यासाठी आनंददायी ठरला.प्रकल्प कार्यालयाचा एक नावीन्यपूर्ण उपक्रमशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा , हिवरी व कापरा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्याच्या तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या टिपेश्वर अभयारण्याला भेट दिली. भेटीत सर्वप्रथम विद्यार्थ्यांना वनपाल यांनी अभयारण्याचा एकंदरीत विस्तार, पशु पक्षी आणि जंगली प्राण्याबद्दल माहिती दिली. अभयारण्यामध्ये असणारे श्वापदे तसेच त्यांच्या रक्षणासाठी शासन पुरवीत असलेल्या सर्व सुविधा आणि वन उत्पादने व सर्वांनी जंगलाचे रक्षण करून पर्यावरण जागृती बाबत सखोल मार्गदर्शन केले. जंगलाची भ्रमंती करीत असताना हरीण, नीळ व अचानक पट्टेदार वाघाचे दर्शन घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण झाला.प्रशासन ते सुशासन या उपक्रमा अंतर्गत प्रशासकीय कामकाज कशा पद्धतीने चालत असते हे शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावे याकरिता पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय ,पोलीस स्टेशन कार्यालय , उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाला भेटी देण्यात आल्या. भेटीत विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यालयाच्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली माननीय तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्नोत्तरे विचारली .त्यांनी अथक प्रयत्न व मेहनत करून विद्यार्थ्यांनी प्रशासनातील उच्च अधिकारी व्हावे अशी आशा व्यक्त केली.तहसीलदार होण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थिनीला तहसील कार्यालयाच्या प्रमुख खुर्चीवर विराजमान करून विद्यार्थ्यांना आनंदाचा क्षण अनुभवास दिला .प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) .मनोहर उके यांनी विद्यार्थ्यांनी भेट दिलेल्या कार्यालयाबाबत व पर्यटनाबाबत विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली.प्रकल्प कार्यालयाचे अधीक्षक. सचिन राठोड यांनी विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करून प्रशासकीय सेवेत येऊन सामाजिक सेवा व आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे मार्गदर्शनातून प्रेरणादायी विचार स्पष्ट केले.प्रकल्प कार्यालयाचे नियोजन अधिकारी यांनी आदिवासी विकासाच्या विविध योजनेबाबत माहिती देऊन ही माहिती आपल्या गावोगावी प्रचार आणि प्रसार करून या योजनांचा लाभ सर्व आदिवासी बांधवांना मिळावा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रकल्प कार्यालया मार्फत विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची पुस्तके भेट म्हणून देण्यात आली खाऊ वाटप करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पर्यटनापासून प्रशासनापर्यंत या उपक्रमात आलेल्या अनुभवाची संपूर्ण माहिती शाळेत विद्यार्थ्यांसमोर कथन करावी असे सुचविण्यात आले. मा.प्रकल्प अधिकारी याच्या अभिनव कल्पनेतून व नियोजनातून विद्यार्थ्यांना शिक्षणासह प्रशासकीय माहिती मिळवण्याची संधी निर्माण झाली..
