
मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉक्टर अटकेत”यवतमाळ
वर्धा प्रतिनिधी जिल्ह्यातील सावंगी मेघे येथून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, मुलीला दीर्घकाळ मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून वडील असलेल्या डॉक्टराविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सावंगी मेघे पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0048/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 108 अंतर्गत आरोपी डॉ. अरुण उत्तम वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.काय आहे संपूर्ण प्रकरण?फिर्यादी डॉ. सौ. सुषमा अरुण वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी कु. नक्षत्रा अरुण वानखेडे (वय 18) हिला वडील डॉ. अरुण वानखेडे यांनी सन 2021 पासून सातत्याने मानसिक छळ केला.विवाहबाह्य संबंधांबाबत जाब विचारल्यामुळे नक्षत्राला “तू माझी मुलगी नाहीस, तू पापाचे फळ आहेस, कलंक आहेस, तू मरून जा” अशा शब्दांत अपमानित करून त्रास दिला जात होता.सुसाईड नोट आणि धक्कादायक खुलासेदिनांक 26 जानेवारी 2026 रोजी नक्षत्राच्या स्टडी रूममध्ये सापडलेल्या रजिस्टरमध्ये इंग्रजी व मराठी भाषेत लिहिलेला मजकूर आढळून आला.त्यामध्ये वडिलांकडून रात्री खोलीत येऊन अश्लील कृत्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, हे रजिस्टर पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत.हेलियम गॅसद्वारे आत्महत्यादिनांक 05 डिसेंबर 2025 च्या रात्री 11.30 ते 06 डिसेंबर 2025 सकाळी 7.00 या दरम्यान नक्षत्राने हेलियम गॅस सिलेंडर व प्लास्टिक पन्नीच्या साहाय्याने आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.पोलिसांची तात्काळ कारवाईया प्रकरणाची गंभीर दखल घेतपोलीस अधीक्षक वर्धा सौरभ अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस निरीक्षक पंकज वाघोडे,पीएसआय विशाल डोनेकर, पीएसआय सचिन कानडेयांनी उमरखेड (जि. यवतमाळ) येथून आरोपी डॉ. अरुण वानखेडे याला ताब्यात घेतले आहे.घटनेने समाज हादरलाउच्चशिक्षित डॉक्टर कुटुंबातील ही घटना समाजाला हादरवणारी असून, मुलींवरील कौटुंबिक मानसिक अत्याचाराचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीविरोधात कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
