
भाविक भक्तांनी ऐतिहासिक सोहळ्याचा लाभ घ्यावा – सिद्धिविनायक विश्वस्त मंडळ. ता प्रतिनिधी.आशिष सावंकार- बोरी अरब (चंद्रशेखर ) हि साधू संतांची पवन भुमी म्हणून ओळखली जाते. अनेक वर्षापासून आठवडी बाजारामधील सिद्धिविनायक गणपती मंदिर संपूर्ण भक्तांचे श्रद्धास्थान आहे. आणि आज येथील सिद्धिविनायक विश्वस्त मंडळातील सर्व भाविक भक्तांच्या ग्रामस्थांच्या माध्यमातूनसंतानी म्हटले आहे. ” इवलेसे रोप, लावीयले द्वारी..तयाचा वेणू गेला गगनावरी….” इवलेसे रोपट्याचे मोठ्या मंदिरात रुपांतर होताना सर्वत्र आनंद निर्माण झाला आहे.बोरी येथील आठवडी बाजारांमधील गणपती मंदिराचे पुननिर्माण व श्री गणपती मूर्तीची प्राणप्रिष्ठा कार्यक्रम मंगळवार दिनांक 3 फरवरी 2026 पासून ते शुक्रवार 6 फरवरी 2025 पर्यंत अशी भव्य आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 3 फरवरी मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता श्री गणपती मूर्ती पूजन अणि संध्याकाळी 7 वाजता ” गणपती अथर्वशीर्ष पठण महिला मंडळ बोरिअरब महिला महिला मंडल दारव्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दिनांक 4 फरवरी बुधवार रोजी सकाळी 9 वाजता गणेश मूर्तीची,व भगवान शंकर पिंड अणि नंदी महाराज यांची भव्य अशी नगर भ्रमण शोभायात्रा निघणार आहे. तसेच सकाळी 11.30 वाजता गणेश पूजन हवन आरती चे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 7 वाजता श्रीराम दरबार सुंदर कांड मंडळ अकोला द्वारा आयोजित संगीतमय सुंदरकांड पठण याचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 5 फरवरी रोजी सकाळी नऊ वाजेपासून गणपती श्री नर्मदेश्वर ज्योतिर्लिंग व नंदी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन प्रारंभ होईल व दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी अभिजीत मुहूर्तावर श्री गणेश मूर्ती स्थापना, नर्मदेश्वर ज्योतिर्लिंग व श्री नंदी महाराज यांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात येईल. ही स्थापना पंडित श्री श्याम सुंदर दायमा यांच्या द्वारा करण्यात येईल. संध्याकाळी 7 वाजता श्री ओम चायल अणि संच अमरावती द्वारा आयोजित श्याम भजन संध्या कार्यक्रमाचा भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक 6 फरवरी सकाळी 10.30 वाजता महा आरती व सकाळी 11.30 पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या सर्व गावातील व परिसरातील लोकांनी सहभाग घेण्याचे उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक समिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर बोरी चंद्रशेखर यांनी केले आहे. मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी आयोजकाकडून आवाहन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
