प्रतिनिधी हिवरी
यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत एकाच रात्री सात ठिकाणी घरफोड्या करण्यात आल्याची घटना हिवरी,भांब (राजा) आणि मंगरूळ( का.) येथील बियर बार फोडण्यात आला या सर्व ठिकाणा वरून जवळपास 7 लाख रुपयाचा ऐवज व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबवली,या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांच्या झोपा उडाल्या आहे.तर काही अज्ञात महिलांचाही वावर परिसरात वाढला असल्याचेही दिसून आले आहे,डोक्याचे केस घेण्याचे निमित्याने घरोघरी फिरत असल्याने आणखी संशय बळावला आहे. सविस्तर असे की 16 डिसेंबर च्या मध्य रात्री अज्ञात चोरट्यांनी ज्यांच्या घरी कुणी राहत नाही अशांच्या घरांना टार्गेट करून त्याच घरी चोरी करून रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने लांबविले,हिवरी येथील सुभाष भिकमचंद लोहिया यांच्या घरी कुणी राहत नव्हते त्यांचा संपूर्ण परिवार यवतमाळ येथे राहण्यास गेल्याने त्यांचे घर कुलूप लाऊन बंदच होते त्यांचे घराचे कुलूप कटर सारख्या यंत्रांनी कापल्याचे दिसून आले त्यांच्या घरातील देवांच्या मंदिरात पुरातन चांदीचे शिक्के किंमत अंदाजे पाच ते सात हजार रुपये असा ऐवज नेला,त्या नंतर याच गावातील निलेश ठाकरे यांचे पानटपरीचे दुकान असून त्याचेही कुलूप त्याच प्रकारे कापण्यात आले त्या नंतर भांब (राजा) येथील सुरेश चिंधुजी पात्रीकर यांच्याही घरी कुणी नसल्याचे पाहून त्याच प्रकारे चोरी करण्यात आली यात 160 हजार नगदी 1 लाख 42 हजार सोन ,तर मारोती लांजेवार यांचे घरून 66 हजार रुपयांचे सोन,2 लाख 50 हजार रुपये रोख व ऐवज लंपास करण्यात आला तर येथीलच सुरेश डीवरे यांच्या दुकानातील दहा हजार रुपये रोख नेण्यात आले त्या नंतर मंगरूळ का. येथील बाळासाहेब गिरपुजे यांचे बियर बार फोडून गल्ल्यातील दोन हजार रुपये रोख व काही महागड्या दारूचाही आस्वाद चोरट्यांनी घेतल्याचे दिसून आले या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने,ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सुनील नाईक, फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी,खुशाल खांदवे, तुषार जाधव, गणेश घोषे, विशेष गुन्हे शाखा या साखळी चोरी प्रकरणी तपास करीत आहे.
