
प्रतिनिधी
महंत ब्रह्मविद्याविभूषित उपाध्याय कुलाचार्य वर्धनस्त प. पु. प. म. आचार्य प्रवर श्री बिडकर बाबाजी महानुभाव (रणाई) व प. पु. प. म. आचार्य प्रवर श्री कारंजेकर बाबाजी महानुभाव (अमरावती)प.पु.प.म. रेवेराज बाबा (दिल्ली )या तीन्ही महान महंतांचा पावन योग एकाच वेळी घाटंजी येथे घडून येणे, हे घाटंजी तालुक्यासाठी अत्यंत भाग्याचे व पुण्यलाभाचे मानले जाते. अशा दिव्य संतसमागमामुळे परिसरात आध्यात्मिक ऊर्जा, व संस्कारांची पेरणी होते.या शुभप्रसंगी राष्ट्रीय नंद गवळी समाज संघटना, घाटंजी यांच्या वतीने तिन्ही महंतांचा भव्य सत्कार समारंभ व पूजनाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे नियोजन प पु प म गोविंदराज बाबा रिद्धपूरकर यांनी केले.या कार्यक्रमातून समाजामध्ये एकात्मता, श्रद्धा व परंपरेचा सन्मान जपला गेला. घाटंजी तालुक्याला लाभलेला हा पुण्ययोग चिरस्मरणीय असून, याचा अभिमान प्रत्येक घाटंजीकराने बाळगावा असा आहे.हा पावन सोहळा यशस्वीपणे घडवून आणण्यामागे राष्ट्रीय नंद गवळी समाज संघटना, यवतमाळ जिल्हाध्यक्ष आदरणीय ओंकार चेके यांचे मोलाचे मार्गदर्शन, नियोजन व परिश्रम लाभले. यावेळेस घाटंजी तालुका राष्ट्रीय नंद गवळीसमाज संघटनेचे अध्यक्ष केशवराव चेके, उपाध्यक्ष अनिल घाटोळ, सचिव दत्तराज घोडे, जिल्हा देखरेख समितीचे सदस्य सुधाकर चौधरी, मनोहरजी घाटोळ, (माथणी) जिल्हा सदस्य अरुणभाऊ अरबट युवा जिल्हा सहसंघटक शुभम घोडे, घाटंजी तालुका सल्लागार दादारावजी चौधरी, नंदूजी चौधरी, यादवराव घोडे (सर) पुंडलिकराव अवथळे, गोविंदराव कालोकार, तुकारामजी चेके, अरुण चौधरी बापूरावजी अरबट पुरुषोत्तम अरबट, मनोहर घाटोळ, नितीन बोपटे, दादारावजी घोडे,रवींद्र घोडे, निलेश घोडे, राजू कालोकार ,गोपाळ घाटोळ, मधुकर चौधरी, अजय घोडे, गजू चेके,भरत भाऊ तायडे ,जिल्हा सहसंघटक विजू चावरे ,गजू चेके, अंकुशराव काकडे ,अनिल पाणे ,राजेश घोडे ,नयन चेके, राजू काळे व महिला वर्ग नीलिमाताई घोडे कविताताई अरबट विजयाताई घोडे जयश्रीताई चेके, रूपालीताई घोडे, मायाताई चेके ,ममताताई कालोकार, व अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
