
बोरी अडगाव (प्रतिनिधी)
आझाद नारी फाउंडेशन चा चौथा नंदाई कन्यारत्न पुरस्कार-२०२६कु.निकिता संतोष बोहरपी यांना बहाल..!नंदाई कन्यारत्न पुरस्कार – २०२६कु. निकिता संतोष बोहरपी शालान्त वर्ष: २०२४-२५”नंदाईचा वारसा गुणवत्तेचा आरासा!!””गेल्या तीन वर्षांच्या परंपरेला जपत, ‘आझाद नारी फाउंडेशन’ आज चौथ्या ‘नंदाई कन्यारत्न पुरस्कारा’चे वितरण करण्यात आले.आझाद नारी फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी इयत्ता ७ वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थीनीस नंदाई कन्यारत्न पुरस्कार देण्यात येतो या वर्षी सुद्धा, चौथा नंदाई कन्यारत्न पुरस्कार आज कु.निकिता संतोष बोहरपी ह्या विद्यार्थीनिस शै. वर्ष-२०२४-२५ मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या निमित्त बहाल करण्यात आला.यावेळी संस्थेचे संचालक मा.राहुलभाऊ सुरवाडे यांनी सांगितले कीं, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यातून त्यांना ऊर्जा व प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण, अभ्यासातील सातत्य आणि त्यांनी मिळवलेले हे दैदीप्यमान यश हे केवळ त्यांच्या साठीचं नाही, तर संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी प्रेरणादायी असते. त्यामुळे या गुणवत्तेचा आणि स्त्री शक्तीचा यथोचित गौरव करण्यासाठी, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मंगल दिनी नंदाई कन्यारत्न पुरस्कार देऊन अत्यंत हर्षाने सन्मानित करतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात हा पुरस्कार एक मैलाचा मानबिंदू ठरावा त्यासाठी संस्था सर्वोतोपरी विद्यार्थी हिताचा विचार करून शैक्षणिक साहित्य व शालेय आर्थिक मदत सुद्धा करते. ज्यामुळे विद्यार्थी जिद्दीने शिकतात.यावेळी केंद्र प्रमुख-हरिदास पाटेखेडे सर, मुख्याध्यापक सर, सरपंच, संस्थेच्या आधारस्तंभ सौ.नंदाबाई प्रल्हाद सुरवाडे, श्री.साहेबराव सुरवाडे, शाळेचे मुख्याध्यापक चोपडे सर, कानपुरे सर, पाटेखेडे सर, बुंदीले सर, मारोती नाईक, प्रदीप बघे, दादु उमाळे, शिवा ठाकरे, राहुलभाऊ सुरवाडे व पत्रकार सचिन बोहरपी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व इतर सदस्य मान्यवर, आजी माजी विद्यार्थी, पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
