
महापुरुषांच्या जयंती समाजासाठी प्रेरणादायी – आमदार किसनराव वानखेडे उमरखेड औदुंबर पत्रकार बहुउद्देशीय संस्था उमरखेड अध्यक्ष वसंतराव देशमुख आयोजक यांच्या संकल्पनेतून आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली .औदुंबर पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या संकल्पनेने मागील दहा वर्षापासून उपक्रम सुरू असून आज सकाळी आठ वाजता सिद्धेश्वर मंदिराच्या पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी पत्रकारांसमवेत औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य उपस्थित होते . त्यानंतर स्थानिक शिवाजी चौकात रक्तदान शिबिर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा व नवनियुक्त उमरखेड ठाणकी नगरपरिषद नगरपंचायत च्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार व आत्महत्याग्रस्त विधवांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले .स्थानिक शिवाजी चौकात अभिवादन ,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांना साडी चोळी वाटप व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार चा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किसनराव वानखेडे होते .यावेळी बोलताना त्यांनी महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी या समाजासाठी प्रेरणादायी असून औदुंबर पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख व सदस्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले .यावेळी माजी आमदार विजयराव खडसे, चितांगराव कदम सहसंपर्क प्रमुख शिवसेना शिंदे ,ख वि संघ अध्यक्ष सुदर्शन रावते , उमरखेड नगराध्यक्ष सौ तेजश्री जैन , ढानकी नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ अर्चनाताई वासमवार , उपाध्यक्ष दत्तदिगंबर वानखडे , काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस तातुजी देशमुख ,काँग्रेस तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे , ॲड संतोष जैन ,पुसदचे संचालक ॲड भरत जाधव , प्रकाश देशमुख ,राजेश खामनेकर ,ऍड विलासराव देवसरकर ,यशवंत गिरी ,शिवकांता वासमवार ,अरविंद भोयर , गजानन सुरोशे , सतिश नाईक , प्रविण पाटील मिरासे , संजय सल्लेवाड , गजानन देशमुख ,पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष मुडे सह सर्व पत्रकार बांधव व सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते .सूत्रसंचालन साहेबराव धात्रक तर आभार अरविंद ओझलवार यांनी मांनले .
